युवतीला दिवस गेल्याने उघडकीस आले प्रकरण, पोलिसांनी मावस भावाच्या आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी / कागल
पंधरा दिवसाकरिता रहायला आलेल्या अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत तरुणीच्या तक्रारीनंतर शिरोली पुलाची एमआयडी येथील ऋत्विक शिवाजी सुतार (वय २१) याच्याविरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. शासकीय रूणालयातील महिला डॉक्टरांच्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मावस बहिण -भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
बापाचे छत्र हरविलेली पंधरा वर्षाची पीडीत युवती आपल्या आईसोबत राहते. ही तीन महिन्यापूर्वी पुलाची शिरोली येथे राहणाऱ्या मावशीकडे राहण्यासाठी गेली होती. ३० जून, १ जुलै व २ जुलै या काळात मावस भावानेच तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत कोणालाही सांगू नको अशी धमकी त्याने दिली होती. पिडीत युवतीने भितीपोटी या घटनेची कोणालाही माहिती दिली नाही. मात्र अडीच महिन्यानंतर तिला शारिरीक त्रास जाणवू लागला. त्यामुळे या मायलेकी उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत युवतीला दिवस गेल्याचे निष्पन्न झाले . महिला डॉक्टरांनी ही माहिती एका पोलिस अधिकाऱ्याला दिली. पोलिसांनी पिडीत युवतीसह तिच्या आईला विश्वासात घेऊन याबाबत विचारपूस केली. प्रथम त्यांनी बदनामी होण्याच्या भितीपोटी सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. मुलीला होणारा त्रास वाढल्याने त्यांनी अखेर घडलेली घटना पोलिसासमोर कथन केली. कागल पोलिसांनी या प्रकरणाची सत्यता तपासून अखेर तिचा मावस भाऊ ऋत्विक सुतार याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील ऋत्विक सुतार याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (फ ), (न ) बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ सह बाल न्याय अधिनीयम २००० चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आह . त्याला आज न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रितमकुमार पुजारी हे करीत आहेत .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









