वार्ताहर/टोप
कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मादळे गावातील अमरावती येथुन आलेल्या एका कैदयाला कोरोनाची लागण झाली आहे. मादळे परीसरात पहिलाच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
१४ मे रोजी हा व्यक्ती अमरावती येथुन मादळे ला आला आहे. तो एक कैदी असुन पॅरोलवर सुटुन सुट्टीवर आल्यानंतर त्याला गावातील कोरोना दक्षता समितीचे सरपंच, सदस्य, पोलिस पाटील या मंडळीनी क्वारंटाईन केले होते. त्यानंतर तेथुन त्याचा सी.पी.आर मध्ये स्वॅब घेतला असता त्याचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारसाठी सीपीआरला हलविण्यात आले आहे. सादळे मादळे कासारवाडि गाव पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आले आहे.
एम.आय.डी.सी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तो कोठे कोठे गेला आहे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहे याबाबतही माहिती घेतली जात आहे. त्यांचेहि स्वॅब घेतले जाणार आहेत. याची चौकशी करुन त्यांचीही विचारपुस केली जात आहे. सर्व शासकीय यंत्रणेबरोबर दक्षता समितीही पूर्णपणे खबरदारी घेत आहे.
Previous Article‘सारेगमप’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Next Article काश्मीर भारताचा अंतर्गत विषय!








