श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पूर परिस्थितीबाबत पाहणी करत असताना दिले आश्वासन
प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्याला वरचेवर भेडसावणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दिले ते पूर परिस्थितीबाबत पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी येथे भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला.
शिरोळ तालुक्याला 2005, 2006, 2007 व 2019, ,2021 साली आलेल्या महापुरामूळे महाराष्ट्र सह अनेक राज्यात श्री दत्ताची राजधानी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील पुराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर खासदार धैर्यशील माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपसरपंच रमेश मोरे, ग्रा प सदस्य धनाजी जगदाळे, अमोल विभूते तसेच संजय गवंडी आदींनी महापुराबाबत च्या समस्या तीव्रपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समोर मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिरोळ तालुका ला सातत्याने भेडसावणाऱ्या महापुराबाबत लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी दिले तसेच उद्या याबाबत तातडीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते, पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
स्वागत कमानीतूनच मुख्यमंत्र्यांचा श्रीदत्त चरणी दंडवत
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पुराचे पाणी अध्याप तुंबली असून दत्त मंदिर अद्यापी पाण्याखाली आहे शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे भेट दिली. मात्र पुराचे पाणी मंदिरावर असल्यामुळे त्यांना दत्त दर्शन घेता आले नाही. त्यांनी ग्रामपंचायतीच्या स्वागत कमानीमधूनच श्री नमस्कार केला तर गुरुवारी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा श्री क्षेत्र नृसिंहवाडी पूर पाणी ला भेट दिली व त्यांनी उत्सव मोठी ठेवलेल्या ठिकाणी जाऊन श्री चरणी प्रार्थना केली. यामुळे विद्यमान मुख्यमंत्री यांचे कमानीतून दर्शन तर माजी मुख्यमंत्र्यांची उत्सवमूर्ती चरणी जाऊन प्रार्थना याचीच एक वेगळी चर्चा गुरु गस्त नागरिकांमध्ये आज रंगली होती.









