रवींद्र आडसुळ यांच्यापाठोपाठ शिल्पा दरेकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेत आता तीन उपायुक्त झाले आहे. शिल्पा दरेकर यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून त्या रूजूही झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र आडसूळ यांची उपायुक्तपदी नियुक्त झाली होती. त्यामुळे आता निखिल मोरे, रविकांत आडसूळ आणि शिल्पा दरेकर असे तीन उपायुक्त महापालिकेत कार्यरत झाले आहेत.
महापालिकेला उपायुक्त दर्जाची तीन पदे मंजूर आहेत. यातील दोन पदे रिक्त होती. निखिल मोरे यांची नियुक्ती राज्य शासनाकडून झाली होती. त्यानंतर दोन पदांवर कोण येणार, याची चर्चा होती. गेल्या आठवड्यात रविकांत आडसूळ जिल्हा परिषदेतून महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. त्यानंतर आता शिल्पा दरेकर रूजू झाल्या.
तीन उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त
महापलिकेत आता तीन मोरे, आडसूळ, दरेकर या तीन उपायुक्तांबरोबरच विनायक औंधकर, संदीप घारगे, चेतन कोंडे हे तीन सहाय्यक आयुक्त आहेत.
अधिकारी भरले मात्र 1800 पदे मात्र रिक्त
महापालिकेत ऑर्डर देणारे अधिकारी आता भरपूर झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम करणार्या कर्मचार्यांची संख्या कमी आहे. मंजूर पदांपैकी तब्बल 1800 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामावर होतो. अधीक्षक, क्लार्क दर्जाच्या अनेक कर्मचार्यांकडे तीन चार विभागांचे चार्ज आहेत. त्यामुळे ही पदेही भरण्याची मागणी होत आहे.








