प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. तर कोल्हापूर महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. नूतन आयुक्तपदी कादंबरी बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारीदी कार्यरत होत्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापुरात महापूर आणि कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचे राज्यभरात कौतुक झाले. कामाच्या शैलीमुळे डॉ. कलशेट्टी हे जनतेतही लोकप्रिय आहेत. त्यांनी 2019 च्या महापुरानंतर शहरात स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेतली. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेत कोल्हापूरकरांनीही चांगली साथ दिली. त्यामुळेच त्यांची कोल्हापुरात स्वच्छतादूत अशी ओळख आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









