दररोज होणार सहा प्रभागांचे सर्व्हेक्षण, तपासणी, सर्व्हेक्षण अन् फवारणी सुरु
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात कोरोनाचे संकट कायम असताना आता डेंग्युने डोके वर काढले आहे. शहरासह उपनगरात डेंग्युचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनासोबतच महापालिकेला आता डेंग्युशी सामना करावा लागत आहे. महापालिकेने बुधवारपासून डेंग्यु प्रतिबंधात्मक मोहिमेला प्रारंभ केला. यातंर्गत प्रभागांमध्ये तपासणी, फवारणी अन् सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने महापूराचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना, डेंग्यु आणि महापूर या तीन संकटांशी महापालिका यंत्रणेला एकाच वेळी सामना करावा लागत आहे.
शहरासह उपनगरात डेंग्युचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने 21 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत शहरात डेंग्यु प्रतिबंधात्मक मोहीम राबवली आहे. या मोहीमेला बुधवारपासून प्रारंभ झाला. मोहिमेतंर्गत दररोज शहरातील 6 प्रभागांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. बुधवारी शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनी, गंगावेश, शहाजी वसाहत या प्रभागात सर्व्हेक्षण केले. यामध्ये डासांचे उत्पत्ती स्थान नष्ट करणे, औषध फवारणी, धूर फवारणी करणे, नागरिकांना आठवडÎातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच डासांच्या आळÎा आढळून आलेल्या कंटेनरमध्ये टेमीफॉस औषध टाकून आळÎा नष्ट करण्यात आल्या.
सिमेंट पाईप्स विक्रेत्याला 2 हजार दंड
शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर परिसरात विक्रीसाठी तयार केलेल्या सिमेंटच्या सेप्टीक टाकी उघडÎावरच ठेवण्यात आल्या होत्या. सर्व्हेक्षणामध्ये येथील टाकींमध्ये डेंग्यु डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सह्याद्री सिमेंट पाईप्सचे मालक यांना महापालिकेने दोन हजार रुपयांचा दंड केला.
खासगी लॅबना रुग्णांची माहिती देण्याची सूचना
डेंग्युचे बहुतांश रुग्ण उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जातात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला रुग्णांची माहिती उपलब्ध होत नाही. शहरातील अनेक परिसरात घरोघरी डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील खासगी लॅबना डेंग्यु रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्याची सुचना महापालिकेने केली आहे.
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
पावसाची संततधार सुरु असल्याने डबे, टायरी यासह उघडÎावरी अन्य वस्तूंमध्ये पाणी साचून डेंग्यु डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या परिसरात पावसाचे पाणी कशामध्ये साचून राहिले आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आठवडÎातील एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.









