वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालूक्यातील मसुद माले येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभांगी पाटील (वय ३०) असे या मृत पत्नीचे नाव आहे. आज, शुक्रवार (दि. 25) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, हा खून घरगुती वादातून झाला असल्याची चर्चा गावात सुरू आहे. तर, पती दत्तात्रय पाटील स्वताहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला. पहाटेच खून झाल्याने सकाळी सर्व मालेसह परिसरात खूनाचे वृत्त पसरले असून गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Previous Articleपंजाबमध्ये एका दिवसात 1,793 नवे कोरोना रुग्ण
Next Article ब्राझीलमध्ये 40 लाख रुग्ण कोरोनामुक्त









