वारणानगर / प्रतिनिधी
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा गावो – गावी व्यस्त आहे असे असताना मात्र मसुद माले या लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावात लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून कोरोना संसर्गला रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करून राबविलेल्या नियोजनबध्द यंत्रणेमुळे गावात आजअखेर कोरोना बाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सध्या माले गावाने राबविलेल्या मायक्रोप्लॅनींग नियोजनाचे व कोरोनाला रोखण्यासाठी निर्माण केलेल्या यशस्वी पॅटर्नचे कौतुक होवू लागले आहे.
जिल्हयात कोरोनाचे संकट सुरु झालेवर माले गावाने नियोजनबध्द कार्यक्रम आखला. मालेच्या लोकनियुक्त सरपंच भारती पाटील, उपसरपंच उत्तम पाटील, सर्व ग्राम पंचायत सदस्य, दक्षता कमिटी, आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येवून कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू ठेवले. माले हे गाव साडेआठ हजार लोकसंख्या असणारे असून
पन्हाळा तालुक्यातील पंचायत समिती मतदारसंघ म्हणून ओळख असणारे गाव आहे.
सुरुवातीच्या काळात माले गावात शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करून प्रत्येकाने तोंडाला मास्क लावण्याबरोबरच सॅनीटायझरचा वापर बंधनकारक ठेवण्यास सांगून प्रत्यक्षात कामास सुरुवात केली. गावातील प्रत्येक वार्डात ग्रामपंचायती मार्फत हायड्रोकलोरीनची फवारणी तसेच धूर वाफ फवारणी अभियान दर आठवडयाला राबविले. त्यामुळे तापासारखे इतर आजार थांबण्यास मदत झाली.त्यानंतर आमदार डॉ.विनय कोरे यांच्या माध्यमातून सर्व कुटुंबांतील नागरीकांना अर्सेनिक अल्बम -३ गोळया वाटप करण्यात आल्या. गावात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस १०० रूपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला व दंडाच्या रक्कमेतून मास्क देण्यात आले गावातीत इरिगेशन,दूध संस्था सह इतर संस्था आणि लोकसहभागातून निधी उभारून मास्क आणि सॅनी टायझर उपलब्ध करून गावातील नागरीकांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.गावातीत रेशन धान्य वाटप,पाणी, भाजीपाला, नियोजन यासह सर्व सोई-सुविधा देण्याचे नियोजन बध्द प्रयत्न करण्यात आले.
शिवाय बाहेरून आलेल्या व्यक्तीला कारंटाईन करण्यासाठी गावातील आश्रमशाळेत व अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी फार्म हाऊसवर राहण्यासाठी बेड व त्यांच्या भोजनाची चांगली व्यवस्था करण्यात आली.प्रसंगी त्पा व्यक्तीच्या स्वॅब तपासणीची काळजी घेण्यात आली.ज्यांचे स्वॅब घेण्यात आले त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिह आले.कोरोना बाधित पेशंट रोखण्यास प्रयत्न करण्यात आले.
कोरोना काळात गावातील नागरीकांच्या वैद्यकीय सेवेत पहिल्या दिवसांपासून डॉक्टरच्या टीमने सहकार्य करून वैद्यकीय उपचार सुरू ठेवलेत. काही गावामधून नेहमीच्या सर्दी, खोकला आजाराला उपचार करण्यास रुग्णांना टाळाटाळ केल्याचे दिसून आले मात्र मालेत सर्वच डॉक्टरांनी असा भेदभाव न करता उपचार करून आधार दिला.गावात अॅम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील डॉ.डी.जे.भोपळे,डॉ. रणजीत चव्हाण, डॉ.मेघा चव्हाण, डॉ. विनायक चव्हाण, डॉ. संदीप काळे,डॉ. वसंत शिंगटे,डॉ.जाधव, सिस्टर शितोळे,नर्स, आरोग्य यंत्रणेचे जयराम पवार,आशा सेविका,अंगण सेविका, शिक्षक,कार्यकर्ते यांचे मोठे सहकार्य मिळाले. वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील,सर्व ग्रामपंचायत व दक्षता समिती सदस्य तसेच शासकीय स्तरावर मार्गदर्शन मिळाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









