प्रतिनिधी/पन्हाळा
गेल्या दोन दिवसापासून पन्हाळ्यासह परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. आज पन्हाळगडाच्या पश्चिमेस असणाऱ्या व मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या खडेखोळवाडीते भाचरवाडी दरम्यान रस्ता खचला. त्यामुळे आधीच दुरवस्थेमुळे नेहमी चर्चेत असणारा हा रस्ता खचल्याने याची दुरुस्ती आता तरी होणार काय ..?हा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील गावंना जोडणारा हा महत्त्वपुर्ण रस्ता मानला जातो. पन्हाळा या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. पण गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. खड्डेच खड्डे चौहीकडे..गाडी घालु कोणीकडे अशी अवस्था वाहनधारकांची या रस्त्यावर होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होवुन देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यात आता हा रस्ता खचल्याने ‘आधीच उल्हास..त्यात फालगुन मास’अशी अवस्था झाली आहे.
गेल्या वर्षी सदरच्या रस्त्याच्या जवळच असलेला बांदिवडे येथील रस्ता, पन्हाळ्याचा मुख्य रस्ता, म्हांळुगे रस्ता खचल्याचे उदाहरण समोर असताना देखील या रस्त्याच्या दुरुस्ती कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष न दिल्याचे हे फलित असल्याची चर्चा मात्र नागरिकांच्यात रंगली आहे. सध्या भाचरवाडी ते खडेखोळवाडी दरम्यानच्या रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत.दरम्यान पावसाचा जोर कायम असुन अजुन हा रस्ता खचण्याची शक्यता नाकरता येत नाही.
Previous Articleअमेरिका : सिनसिनाटी शहरात गोळीबार; 8 ठार
Next Article ‘एफआरपी’ च्या तुकडय़ांसाठी ‘करारपत्र’









