सांगरूळ / प्रतिनिधी
बहिरेश्वर ता.करवीर येथे गुरुवारी एका मयत महिलेच्या उत्तर कार्यात सहभागी झालेल्या सहा नातेवाईकांचा व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
बहिरेश्वर येथे एक वयस्कर मयत महिला मयत झाली होती. तीचे उत्तर कार्याय गुरूवारी होते. त्यामध्ये सर्व नातेवाईक सहभागी झाले होते. त्यामध्ये म्हारूळ येथील महिलेला ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांच्या कडे उपचार केले होते. पण ताप कमी न झाल्यामुळे सदर महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.
त्यामुळे सर्वच नातेवाईकांची भितीने गाळण उडाली. सहभागी महिलांचे स्वॕब घेतले होते. त्यामध्ये आरे येथील एक महिला, पासार्डे येथील दोन महिला, बहिरेश्वर येथील एक महिला व एक पस्तीस वर्षीय तरूण व स्थानिक डॉक्टर असे सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. बाधितांना कुरुकली येथील कोविड सेंट्ररमध्ये औषधोपचाराठी दाखल करण्यात आले. ग्रामपंचायत बहिरेश्वर स्थानिक वैद्यकिय प्रशासन व कोरोना दक्षता समिती मार्फत गावात स्वच्छता व औषध फवारणी करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








