संचालक मंडळाचा राजीनामा स्विकारण्यास नकार
राजीनामा माघारीसाठी २२ संचालकांचे दबावतंत्र
प्रतिनिधी/भोगावती
शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष व आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मंगळवारी दुपारी अचानक संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला. मात्र संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा स्विकारलेला नसून त्यांचा राजीनामा माघार घेण्यासाठी २२ संचालकांनी त्यांच्यावर दबाव तंत्र चालू केले आहे.
भोगावती साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी १० वा आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा राजीनामा सादर केला आहे. मात्र अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने सर्व जण अवाक झाले आहेत. राजीनामा देऊ नये म्हणून २२ संचालकांनी मागणी केली होती.मात्र त्यांच्या मागणीला दाद न देता अखेर त्यांनी राजीनामा दिला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या माध्यमातून विशेष सहकार्य केल्यामुळेच गेल्या साडेतीन वर्षात आर्थिक अडचणीतील भोगावतीचा सुरळीत कारभार करण्यात यशस्वी झालो आहे.अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
दहा वर्षांपूर्वीचे सत्तांतर करुन पाटील यांनी अध्यक्ष पदाची सुत्रे आपल्या हातात घेतली होती.विधानसभा मतदारसंघा बरोबरच राजीवजी सुतगिरण,श्रीपतदादा बँकेच्या कामकाजातून कारखान्यात पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी पुढे केल्याचे समजते.मात्र कारखान्याच्या गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात आपणहून अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे आमदार पाटील पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









