प्रतिनिधी / गारगोटी
सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचा रुबाब दाखवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी इन्स्पेक्टर युवतीला व तिच्या मामाला पोलिसांनी गजाआड केले. या दोघांनी मिळून भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवक – युवतींना लाखो रुपयांचा गंडा घातला. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२, गारगोटी ) व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (वय-३८, रा. निळपण ) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रियांकाने आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने सत्कार करून घेऊन आपली सीआयडी इन्स्पेक्टर अशी इमेज तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्वास बसला गेला. या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये जमा केले. २५ जुलै रोजी प्रियांका व तिचा मामा विठ्ठल याने निळपण (ता. भुदरगड) प्रतीक्षा साळवी हिच्याकडून दहावी, बारावीचे मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखल्याच्या झेरॉक्स तसेच ५ लाख २५ हजार रूपये उकळले.
साआवडा दोन वषापूर्वी प्रियांकाने इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने सत्कार करून घेऊन आपली सीआयडी इन्स्पेक्टर अशी इमेज तयार करून घेतली.
तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्वास बसला गेला. या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक – युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये जमा केले.२५ जुलै रोजी प्रियांका व तिचा मामा विठ्ठल याने निळपण (ता. भुदरगड) प्रतीक्षा साळवी हिच्याकडून दहावी, बारावीचे मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखल्याच्या झेरॉक्स तसेच ५ लाख २५ हजार रूपये घेऊन सीआयडी विभागाचे बनावट ओळखपत्र दिले.याबाबतची फिर्याद प्रतीक्षाने भुदरगड पोलिसात दिली असून याप्रकरणी प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण यास ताब्यात घेतले आहे.
Previous Articleकोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन
Next Article केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद झाले होम क्वारंटाइन








