पाटगांव / वार्ताहर
पाटगाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या मौनी सागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पाटगाव परिसरात गेल्या चोवीस तासात सुमारे 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात आत्तापर्यंत सुमारे ७२टक्के पाणीसाठा झाला. तर मुसळधार पावसाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज पुरवठा खंडीत होऊन दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. ओढे नाले तुडुंब भरून शेतात घुसल्याने शेतातील बांध फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेतात घुसल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच भुदरगड तालुक्यातील वाघापुर, निळपण, गारगोटी म्हसवे, सुक्याच्या वाडी, करडवाडी, अनप, शेळोली, शेणगांव हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे.
कोंडोशी लघुप्रकल्प पुर्ण भरला आहे. फये, मेघोली या लघु प्रकल्पातील पाणीसाठा वाढत असल्याने या वर्षी हे लघु प्रकल्प लवकरच बनण्याची चिन्हे आहेत. पाटगांव धरणात सध्या पाणी पातळी – 623.93 मी एकूण पाणीसाठा–78.42 द.ल.घ.मी झाल्याने धरण75% भरले आहे धरण परिसरात आज अखेर 3200 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









