प्रतिनिधी / गारगोटी
माजी पंतप्रधान राजीवजी गांधीयांच्या जयंतीनिमित्त भुदरगड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी भुदरगड तालुका काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालकपद निवड झालेबददल सचिन दादा घोरपडे यांचा सत्कार करताना तालुका अध्यक्ष शामराव दादा देसाई, तर एस एम पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शंभूराजे देसाई, खानापूरचे मा.सरपंच भुजंगराव मगदूम, प्रा.सुभाष देसाई, रोहीत मोरे, ॠषीकेश पाटील, धनंजय पाटील अध्यक्ष एन. एस. यु आय ,धोंडीराम मांगले प्रमुख उपस्थित होते.









