इचलकरंजी / प्रतिनिधी
सांगली नाका ते टाकवडे रोड वर पादचारी शेतकऱ्याला भरधाव ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. या अपघातात जखमी शेतकऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तात्यासो आण्णासो दानोळे (वय-45 रा. मारुती मंदिर जवळ, यड्राव ता. शिरोळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अपघातात जखमी झालेल्या तात्यासो दानोळे यांना उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मयत तात्यासो दानोळे हे यड्राव येथील शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आहेत. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









