प्रतिनिधी / कुरुंदवाड
येथील नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील यांच्यावर भरदिवसा येथील पालिका चौकात अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पाणीपुरवठा सभापती, नगरसेवक जवाहर पाटील हे आज सकाळी कामानिमित्त नगरपालिकेमध्ये आले होते. यावेळी पालिके समोरील चौकात अचानक त्यांच्यावर अज्ञाताने खुनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा कुरुंदवाड चौकात हा खुनी हल्ला झाल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पालिका चौकात मोठी गर्दी झाली होती.









