आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी होणार संपात सहभागी असल्याचे माहिती मिळाली असुन आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करत आपल्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपवा लढा अधिक तीव्र केला असला तरी सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाचे उपसलेल्या हत्याराने सर्व सामान्य जनतेचे मात्र यामुळे हाल होणार आहेत.या आशयाचे पत्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विभाग विभाग नियंत्रकांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे.









