वारणानगर / प्रतिनिधी
बोरपाडळे ता. पन्हाळा येथील डोंगराला लागलेली आग लागली होती. एका शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तब्बल ३ तासानंतर अथक प्रयत्नानी ही आग विझवली. मात्र या आगीत पक्षांची पीले, अंडी व सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले.
शहापूर, मिठारवाडी तलाव पासून संपूर्ण डोंगर गिळंकृत करीत आलेली आग बोरपाडळेच्या डोंगरातून पुढे सरकत असताना अविनाश खडके यांच्या निदर्शनास आली. त्यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने तब्बल ३ तासानंतर आग आटोक्यात आणली. गवत कापलेले नसलेने आगीने खूप रौद्र रूप केले होते. आग विझवण्यासाठी अविनाश खडके, शिक्षक आनंदा घारगे, विद्यार्थी शुभम जगदाळे, हर्षल माळी, शुभम जंगम, पारस पाटील, विवेक पाटील, प्रकाश पाटील, पार्थ धुमाळ, प्रथमेश पोवार, पृथ्वीराज सुर्वे, सिध्देश पाटील, प्रतिक जाधव यांनी प्रयत्न केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









