प्रतिनिधी / कसबा बीड
बीडशेड ता. करवीर येथे ‘ब्लॅक पॅथर’ तर्फे आज दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फायनान्स कंपन्यांतर्फ दिलेले कर्ज माफी त्वरीत मिळावी, बचत गटातील महिलांची कर्जमाफी माफ करावी फायनान्स कंपन्याच्या कर्मक ऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, फायनान्स कंपन्याची कर्ज वसूली थांबवावी, या व इतर मागण्यासाठी बीडशेड येथे ब्लॅक पँथर पक्षातर्फ रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
मुख्य चौकात आंदोलकांनी वाहतूकीचा रस्ता रोखला गेला. दुपारी एक वाजता मुख्य चौकात आंदोलक जमले होते. विविध मागण्याच्या घोषणा देत आंदोलकांनी सारा परिसर दणाणून सोडला. मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन छेडून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. फायनान्स कंपनीचे व्यवहार बेकायदेशीर असून कर्मचाऱ्या गैरवर्तना बाबत शासनाने त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनामुळे करवीर पश्चिम भागातील ४० गावांची ग्रामीण वाहतुक तास बर विस्कळीत झाली होती.
या आंदोलनाचे नेतृत्व ब्लॅकपॅंथरचे नेते सुभाष देसाई, करवीर तालुकाध्यक्ष विजय माने, विश्वास कांबळे, रामचंद्र कांबळे, दयानंद शिरोलीकर रोहिणी मिरजकर, श्वेता पोवार, दिनेश माने दयानंद कांबळे , पुंडलीक नाईक, लक्ष्मण जाधव, आदिनी केले होते. ४० गावातील बचत गटातील 300 महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व व आंदोलनकर्त्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकारी म्हणून बीड गावचे तलाठी एन पी पाटीलसाहेब यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस हेड काँ. रवि पाटील, पोलिस नाईक विलास जाधवर, प्रियंका मॅडम, बीड गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ तहसीलदार आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









