ग्राहकातुन तीव्र संताप
वार्ताहर/वेतवडे
धामणीखोऱ्यातील पणुत्रे ता. पन्हाळा परिसरात बीएसएनएल नेटवर्क व इंटरनेट सेवेत वारंवार निर्माण होत असलेल्या अडथळ्यामुळे ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर, बीएसएनएल’ने लवकरात लवकर सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
पावसाळ्यात बीएसएनएलच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून गेली महिनाभर रेंज अभावी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवाउडवीची व उद्धटपणे उत्तरे देत आहेत. त्यामुळे ग्राहकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामणीखोऱ्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण व दुर्गम असल्याने बीएसएनएलची सेवा हेच डिजिटल कनेक्टिव्हिटीचे साधन आहे. अनेक गावात केवळ बीएसएनएलची रेंज मिळत असल्याने संपर्क तसेच इंटरनेट सेवेसाठी बीएसएनएलचा वापर अपरिहार्य आहे. बीएसएनएलकडून पणुत्रेत टॉवर उभारण्यात आला आहे, त्यातून अनेक गावांत बीएसएनएलची सेवा पोहचली. मात्र टॉवर असूनही व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने या टॉवरचा व बीएसएनएलच्या सेवेचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पणुत्रे परिसरात सुमारे 25 गावे व वाड्या वस्ती असलेल्या भागात किमान 7 हजारहुन अधिक ग्राहक बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घेतात. प्रत्येक ग्रा.पं.ला व केडीसीसी बँकेला नेट कनेक्टिव्हिटीने जोडले जात असले तरी, बीएसएनएलच्या सेवेत वारंवार उदभवणारे अडथळे पाहता,ही सेवा ग्रामीण भागाला परिपूर्ण कनेक्टिव्हिटी देणार का,याबाबत साशंकताच आहे. सद्यस्थिती इंटरनेट सेवा अत्यंत धीम्या गतीने चालत असून कॉल ड्रॉपची समस्याही वाढली आहे.
सुरुवातीला बीएसएनएलच्या चांगल्या सेवेमुळे भागातील सर्व ग्राहकांनी विशेष करून शेतकऱ्यांनी बीएसएनएल सीम कार्डचा वापर वाढला .पण गेली काही महीने बीएसएनएल नेटवर्क व इंटरनेटमध्ये सतत बिघाड सुरू असुन गेली महिनाभर तर अजिबात नेटवर्क नाही. तसेच संबंधित अधिकारी तर फिरकलेच नाहीत. त्यामुळे लवकरच आम्ही बीएसएनएलच्या कोल्हापूर मुख्य कार्यालयावर आंदोलन करणार आहोत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








