कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी सहाय्यक उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार 5 रोजी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले.
कोरोणामुळे राज्यातील ग्रामपंचायती सह सहकारी संस्थांच्या निवडणुका दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या या मुदत वाडीत बाजार समितीचा कुठेही उल्लेख आलेला नाही. त्यामुळे विद्यमान संचालकांनी मंगळवारी संचालक पदाची राजीनामे दिले होते तर प्राप्त परिस्थितीत निवडणुकीसंदर्भात कोणतेही आदेश नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती करण्यात आल्याचे उपनिबंधक कार्यालयामधून स्पष्ट करण्यात आले आहे.
बेकायदेशीर नोकरभरती दुकान गाळे असतं तर प्रकरण आधी चौकशी चे काय होणार असा सवाल बाजार समिती वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.