प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य सरकारने संचालक मंडळाची मुदत संपलेल्या बाजार समित्यांना सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लांबणीवर गेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एप्रिल मध्ये सर्व मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिने म्हणजेच जून पर्यंत लांबणीवर टाकल्या या होत्या. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा त्या संस्थांना मुदतवाढ दिली. संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या मात्र संचालक मंडळांना मुदतवाढ न दिल्याने पेच निर्माण झाला होता. संचालक मंडळांना मुदतवाढ न दिल्यास तिथे प्रशासक नेमावा लागतो.
त्यामुळेच राज्य शासनाने संस्था बरोबर संबंधित संचालक मंडळाला ही मुदतवाढ दिली. मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत निर्णय झाला नव्हता. जुलै-ऑगस्टमध्ये राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या मुदती संपत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अशा अशा समित्यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत संबंधित परिपत्रकात कोणतीच स्पष्टता दिसत नाही. दरम्यान कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ६ ऑगस्ट २०२० ला संपत असल्याने त्यांची निवडणूक लांबणीवर गेली आहे. विद्यमान संचालक मंडळा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








