प्रतिनिधी / सांगरूळ
बहिरेश्वर ता.करवीर येथील ३२ वर्षीय तरूण ग्रामपंचायत सदस्याचा शनिवारी दुपारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गावात कोरोनाचा पहिला बळी गेल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधित तरुण कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावच्या दक्षता समितीत सदस्य म्हणून काम करत होते.
मयत ग्रामपंचायत सदस्याच्या घरी रक्षाबंधन दिवशी मेव्हणा आला होता. तो आजारी असल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामपंचायत सदस्याच्या घरातील सर्वजण घाबरून गेले. तातडीने ग्रामपंचायत सदस्याच्या घरातील सर्व लोकांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यासह पत्नी, मुलगा व वडील असे चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
सदस्यावर सीपीआर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्याचा स्वातंत्र्य दिनी मृत्यू झाला. घरातील सर्वावर कुरूकली येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने गावात नागरिकांना मास्क वापरणे सक्ती केली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व दक्षता समिती यांची बैठक होऊन उद्या श्रावण सोमवारी होणारी श्रीकृष्ण यात्रा रद्द केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









