प्रतिनिधी / वारणानगर
बच्चे सावार्डे ता. पन्हाळा येथील खडी भागात म्हैस चरावयास घेवून गेलेल्या वृध्द शेतकऱ्याचा विहरीत बुडून मृत्यू झाला. भिमराव आण्णा बांदल (वय ८o) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भिमराव हे शेतात विहरीच्या बाजूने म्हैस चरावयास नेत होते. यावेळी म्हैस भुजल्याने हातातील म्हैसीच्या दोरीला हिसडा बसला आणि ते विहरीत पडले. खोलगट विहीर व पायऱ्या नसल्याने त्यांचा बडून मृत्यू झाला. दोर व चिव्याच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेबाबत बाबासो पाटील यानी कोडोली पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. हावलदार कोळेकर,पो.ना. हारूगडे तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे.
Previous Article`तरुण भारत’च्या दिवाळी अंकातून बौद्धिक मेजवानी
Next Article तासगाव तालुक्यात आज कोरोनाचे 12 रुग्ण









