पन्हाळ्याच्या पायथ्याशी गुडे येथील घटना
प्रतिनिधी / पन्हाळा
बहिणीने प्रेम विवाह केल्याच्या राग मनात धरून सख्या भावाने बहिणीवर धारदार शस्त्र विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात बहिण गंभीर जखमी झाली आहे. विश्रांती अविनाश चिखलकर (वय-२३, रा. गुडे, ता.पन्हाळा) असे जखमी बहिणेचे नाव आहे. ही घटना पन्हाळा पायथ्याशी गुडे येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. नागेश पांडुरंग तेली (२०, रा.निगवे दुमाला, ता.करवीर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. विश्रांती हिच्या पाठीत आणि दोन्ही हाताने गंभीर दुखापत झाल्याने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत जखमीविश्रांतीचे चिखलकर यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याची दखल घेत पन्हाळा पोलिसांनी घटना घडल्या पासून दोन तासात सापळा लावून संशयित आरोपीस निगवे येथील घरी मुसक्या आवळल्या आहेत. सकाळी दहा वाजता ही घटना घडताच, गुढे पोलीस पाटील केशव कदम यांनी पन्हाळा पोलिसात वर्दी दिली. पन्हाळा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. शांत डोक्याने सैराट नागेशने केलेल्या कृत्याने गुढे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेने पन्हाळा तालुक्यात संतप्त प्रतिक्रिय उमटत आहेत.
Previous Articleकोल्हापूर : मसाई पठारावरुन कार कोसळली, एकाचा मृत्यू
Next Article प्रतिमिनिट 1 हजार लिटर्स ऑक्सिजनची होणार निर्मिती









