प्रतिनिधी / शिरोळ
शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने 1 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे. या मागण्यांचे निवेदन शिरोळ तालुका कर्मचारी संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी. शंकर कवितके यांना देण्यात आले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक सप्टेंबर पासून आंदोलन करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर पासून काळ्यया फिती लावून काम करण्यात येणार आहे, आणि 8 सप्टेंबर पर्यत मागण्या मान्य झाल्या नाहीतर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागणीचे निवेदन शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी.
शंकर कवितके यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष गर्जन शिरढोणे, अध्यक्षा कांचन चौगुले यांनी आरोग्य सेवक महिलांची पदे भरावीत, रिक्त पदे भरताना कंत्राटी कर्मचारांना प्राधान्य द्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील कर्मचारांना कामांचे स्वरूप जॉब चार्ट ठरवून द्यावा, समान काम समान वेतन द्यावे, गामीण भागात समाजकंटाकडून महिला कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या विरोधात कडक कायदा व्हावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी कोषाध्यक्ष जमीर नदाफ, महेश देशमुख, अमोल कोळी, भारती घोलप, टी. एन. महाडिक, संजय कांबळे, एम. एल. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 322 जण कोरोनामुक्त, 682 जणांचे नमुने तपासणीला
Next Article सातारा : ‘त्या’ दरोडेखोरांना पोलीस कोठडी









