स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
प्रतिनिधी / सातारा
जिह्यातील साखरं कारखानदारांनी मनमानीपणे कारखाने सुरू केले आहेत.यावर तोडगा निघावा, जिह्यातील कारखान्यांनी कोल्हापूर जिह्याप्रमाणे एक रक्कमी जाहीर होऊन चांगल्या पद्धतीने गळीत हंगाम सुरू व्हावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजू शेळके,अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ,देवानंद पाटील आदी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्या 19 वर्षाच्या परंपरेनुसार योग्य ती चर्चा करून दि.2रोजी ऊस परिषद घेऊन शेतकयांच्या हिताची मागणी केली आहे.चालू गळीत हंगामात एक रक्कमी एफआरपी चौदा दिवसाच्या कालावधीत ऊस उत्पादक शेतकयांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, उत्पादनाचा व महागाईचा विचार करता यावर्षी 14 टक्के प्रमाणे वाढ करून अंतिम बिल देण्यात यावे, 2020-21 मध्ये ज्या कारखान्याने बिल दिले नाही अशा कारखान्याच्या संचालक मंडळावर कारवाई कारवाई त्याबाबत विचार व्हावा, तोडणी व वाहतुकीची पैसे शेतकयांकडून वसूल करून घेतात.राजकिय नेत्यांनी यात लक्ष घालावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.









