2 ऑक्टोंबर पर्यंत विशेष मोहिम
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्यावतीने आता थेट प्रभागामध्येच ऑन दि स्पॉट लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत आज, सोमवारपासून 2 ऑक्टोंबरपर्यंत ही विशेष मोहिम असणार आहे. घराजवळच लस मिळणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाट धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे 100 टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. महापालिकेने यासाठी ऑन दि स्पॉट लसीकरण मोहिम सुरू केली आहे. 18 वर्षावरील सर्वांना आता ऑनलाईन बुकींग ऐवजी थेट लस दिली जात आहे. महापालिकेकडून केंद्रामध्ये ही लस दिली जात होती. तरीही अपेक्षित लसीकरण होताना दिसून येत नाही. गेल्या 15 दिवसांपासून लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आता केंद्रा ऐवजी घराजवळच प्रभागामध्ये ऑन दि स्पॉट लस दिली जाणार आहे.
सोमवारी लसीकरण होणारे ठिकाण
मंगळवार पेठ एमएलजी हायस्कूल, शिवाजी पेठेत भारत मंदिर, घाटी दरवजा राधेशाम मंगल कार्यालय, शाहूपुरी महात्मा फुले विद्यामंदिर, गंगावेश कुंभार गल्ली येथील बजापराव तालीम मंडळ, कसबा बावडा आंबेडकर हॉल
28 सप्टेंबर रोजी लसीकरण होणारे ठिकाण
मंगळवार पेठ, एमएलजी हायस्कूल, अर्ध शिवाजी पुतळा सीएमटी हॉस्पिटल, राजारामपुरी जगदाळे हॉल, ब्रम्हपुरी चर्च शेजारी, नागाळा पार्क विवेकानंद कॉलेज, नेहरूनगर विद्यालय, गणेश मंदिर हरिओम नगर, शाहू कॉलेज कारंडे माळ, देवकर पाणंद वीर सावरकर हॉल,
29 सप्टेंबर रोजी लसीकरण होणारे ठिकाण
शिवराज विद्यालय मंगळवार पेठ, वेताळ तालीम मंदिर, जिवेश्वर हॉल सम्राटनगर, हळदीकर हॉल शुक्रवार पेठ, स्वामी मंदिर रूईकर कॉलनी, बापट कॅम्प मार्केट, विरंगुळा केंद्र मेरेमाने नगर,
30 सप्टेंबर रोजी लसीकरण
शाहू दयानंद हायस्कूल मंगेशकरनगर, शास्त्राr चौक शास्त्राrनगर, निगडी हॉल टाकाळा, जरगनगर विद्यालय, सदर बाजार हौसिंग सोसायटी, दत्त मंदिर रमणमाळ, जिवबानाना पार्क राजगाड चौक,
1 ऑक्टोंबर रोजी लसीकरण
वीर ककैया विद्यालय, शाहूनगर दत्तमंदिर, मामा भोसले शाळा दुधाळी, सासणे हायस्कूल ताराबाई पार्क
2 ऑक्टोंबर रोजी लसीकरण
महाराणी ताराराणी हायस्कूल मंगळवार पेठ, लाड चौक, स्पोअर्ट हॉल जागृत्तीनगर, दत्त मंदिर मस्कुती तलाव, ईपी स्कूल कनाननगर,









