प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरात आज ११ कोरोना रुग्णांची भर पडली. शहरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. वडगाव शहर व परिसरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णामुळे पेठ वडगाव येथे कोविड सेंटर सुरु करण्याबाबत खासदार धैर्यशील माने व आमदार राजूबाबा आवळे यांनी आढावा घेतला असून युद्ध पातळीवर येथील कोविड सेंटर सुरु करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.
या बाबत सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीने जिल्हाधिकारी व खासदार धैर्यशील माने यांचेकडे मागणी केली होती. तर यादव आघाडीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना पत्राद्वारे मागणी केली होती. शहरात विविध भागात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे ठिकठिकाणी कंटेंन्मेंटझोन झाल्याचे चित्र झाले आहे. पालिका प्रशासनाची विविध भागात सापडत असलेल्या रुग्णामुळे धावपळ उडाली आहे. शहरातील व्यापारी, व्यावसाईक व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









