प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव व परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे सोशल डीस्टन्सचे पालन करून व गर्दी टाळून गणेश मूर्ती नेण्यात आल्या. वडगाव येथील पत्रकार संतोष सणगर यांनी आपल्या घरी मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापणा करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव रद्द करावा या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीस गावातील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव रद्द केला. सावर्डे येथील गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करून एक गाव गणपती बसविण्यात आला. वडगाव शहरात गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात उत्सव न करता घरगुती पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना करून सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना अत्यंत साधेपणाने करण्यात आली. दरवर्षी ढोल, ताशा, टाळ. मृदंगाच्या गजरात होणार्या गणेशाचे आगमन या वर्षी गणपती बाप्पा मोरया कोरोनाला हरवूयाच्या घोषणांनी शांततामय वातावरणात झाले. कोरोनाच्या संकटामुळे कुंभार गल्लीमध्ये गणेश मूर्ती नेण्यासाठी असलेला उत्साह मावळल्याचे चित्र दिसत होते.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी गणेश मूर्ती नेण्यासाठी होणार्या संभाव्य गर्दी टाळून दोन दिवस अगोदरच गणेश मूर्ती नेण्याबाबत आवाहन केले होते. या आवाहनानुसार गेल्या दोन दिवसातच नागरिकांनी गणेश मूर्ती घरी नेल्या होत्या. यामुळे आज वडगाव शहरात गणेश मूर्ती नेण्यासाठी नागरीकांची गर्दी कमी होती. पत्रकार संतोष सणगर यांनी मुस्लीम बांधवांच्या हस्ते आपल्या घरी सलग पाचव्या वर्षी गणेश प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला. ही गणेश प्रतिष्ठापणा मुस्लीम समाजाचे संचालक आदिलशहा फकीर, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरज जमादार, अस्लम शिकलगार यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी वडगाव पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अशोक जाधव, सुशांत जाधव, पत्रकार संतोष सणगर, मालन सणगर, सारीका सणगर, स्वाती सणगर, समृद्धी सणगर, संकेत सणगर, स्वरा सणगर यांचेसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये वडगाव व परिसरातील गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवून नागरिकांना सोशल डीस्टन्सचे पालन करण्याबाबत नियोजनबद्ध कामगिरी केली. गणेशाच्या आगमनाने वडगाव परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे. मात्र या वर्षी कोरोना संकटामुळे गणेशोत्सवात अबाल-वृद्धांच्या असणार्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









