प्रतिनिधी / पेठ वडगाव
कोरोना संसर्गामुळे विना खबरदारी घेता भाजीपाला विक्री करू नका प्रशासनाने भाजीपाला फिरून विक्री करण्याचे आदेश दिले आहे. या प्रमाणे आपण फिरून भाजीपाला विक्री करण्याबाबत पालिका कर्मचारी यांनी सुचना दिल्या. याची माहिती देवूनही एका भाजीपाला विक्रेत्याने या सूचना न पाळल्याने भाजीपाला जप्ती करत असताना पालिका कर्मचारी यांना अरेरावी करून अंगावर धावून जावून धक्काबुकी करण्याचा प्रकार केल्याने या प्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमाखाली वडगाव पोलिसात पालिका कर्मचारी यांनी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवाहतूक गाडी घेवून कोणतीही खबरदारी न घेता भाजीपाला विक्री करणार्या गोरख तुकाराम पोळ व अमर शंकर पोळ यांची भाजीची टोपली उचलून भाजीपाला जप्तीची कारवाई करत होते. यावेळी पालिका कर्मचारी यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी पालिका कर्मचारी यांनी सरकारी कामात अडथळा आणला तसेच धमकी दिल्या प्रकरणी तसेच कोरोना संसर्गाच्या काळात बेजाबदारपणे वागून कोरोना संसर्ग वाढेल अशी कृती केल्या प्रकरणी वडगाव पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणी वडगाव पोलिसात गोरख पोळ व अमर पोळ (दोघे रा.पेठ वडगाव) यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय पाटील करत आहेत. मात्र आपले कर्तव्य बजावणार्या पालिका कर्मचार्यांना भाजीपाला विक्रेत्याने धक्काबुक्की केल्या बद्दल वडगाव शहरात विविध स्तरातून निषेध करण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








