पेठ वडगाव / प्रतिनिधी
वारणा खोऱ्यातील मुख्य शाखा असलेल्या वडगाव शाखेच्या शाखाधिकारी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर साळी गल्ली येथील एका महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. यामुळे वडगाव शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वीस झाली आहे.
पेठ वडगाव शहरात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात आज वारणा खोर्यात मुख्य शाखा असलेल्या एका सहकारी बँकेचे मॅनेजर यांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ही बँक परिसर पालिका प्रशासनाने प्रतिबंधित करून निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. हे शाखाधिकारी वडगाव शहराजवळच असलेल्या सावर्डे गावाचे रहिवासी आहेत. तर वडगाव शहरातील साळी गल्ली येथील एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पालिकेने हा भागही प्रतिबंधित केला आहे. शहरात आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधीतांची संख्या वीस झाली आहे.
Previous Articleसोलापुरात रविवार वगळता सर्व दुकाने उद्यापासुन सुरु
Next Article धामणी नदीने धोका पातळी ओलांडली, वीजपुरवठा खंडित








