प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगावात एस. टी. बस स्थानक परिसरातील एका फळ व्यावसायिक कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. यामुळे वडगाव शहराची कोरोना रुग्णांची संख्या १३४ झाली आहे. या फळ व्यावसायिकाच्या संपर्कातील लोकांची यादी काढण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, फळ व्यावसायिक व भाजी विक्रेते यांचेकडे गेल्या दोन दिवसात मोठी गर्दी होत असून या व्यावसाईकानी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सचे पालन करण्याबाबत पोलीस व पालिका प्रशासन वारंवार सूचना करत आहे. मात्र, अनलॉक प्रक्रियेमुळे सुरु होत असलेले सर्व व्यवहारामुळे छोटे-छोटे व्यावसायिक व नागरिक आता प्रशासनाचे ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
दरम्यान, सावर्डे येथे कोरोनामुळे आज एका पस्तीस वर्षीय तरुणाचा कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. यापूर्वी सावर्डेत एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यूमुळे सावर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे.









