प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उद्या, शनिवार दि.१ ते ३ मे पर्यंत वडगाव पालिकेने जनता कर्फ्यू घोषित केला आहे. या जनता कर्फ्यूचे नागरिकांनी पालन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनता कर्फ्यू कालावधीत पालिका व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले आहे. पालिका प्रशासन, पालिका सदस्य, पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस पालिका मुख्याधिकारी टीना गवळी, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण व नगरसेवक, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आदी उपस्थित होते. या जनता कर्फ्यूमध्ये वडगांव शहरातील दुध डेअरी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत व मेडिकल दुकान स. 8 ते स. 10 वाजेपर्यत सायंकाळी 4ते 6 वाजेपर्यंत चालू राहतील.
जनता कर्फ्यूमध्ये भाजीपाला, फळ विक्री इतर सर्व व्यवसाय, दुकाने बंद राहतील. या करीता सर्व नागरीक व व्यापारी यांनी नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडू नये अन्यथा कडक कारवाई करणेत येईल असे आवाहन पालिका मुख्याधिकारी टीना गवळी व वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









