प्रतिनिधी / पेठ वडगाव
वडगाव शहरात आज नऊ कोरोना रुग्णांची भर पडली. शहरात कोरोना रुग्णांचा आकडा १२५ झाला आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वडगाव पोलीस ठाण्याची गणेश मूर्ती दोन दिवस अगोदरच पोलीस ठाण्यात नेली व नागरिकांनीही गर्दी टाळण्यासाठी शुक्रवारीच गणेश मूर्ती घरी घेवून जाण्याचे आवाहनही केले.
गणेश चतुर्थीमुळे वडगाव शहरात वडगाव व परिसरातील गावातील नागरिकांची खरेदीसाठी बाजारात आज लगबग सुरु होती. दरम्यान वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी बाप्पा आर्मीच्या माध्यमातून मार्केट यार्ड परिसरात रहात असलेल्या नागरिकांमध्ये कोरोना पासून बचावासाठी खबर्दारीबाबत मार्गदर्शन करण्यास सुरवात केली.
Previous Articleसांगली : तासगाव शहरात कोरोनाने घेतले दोन बळी
Next Article सांगलीत 340 रूग्ण वाढले, 15 जणांचा मृत्यू









