वार्ताहर / बाजारभोगाव
पश्चिम पन्हाळा व दक्षिण शाहूवाडीत पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतलेली नाही. जांभळी व कासारी नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. रस्त्यावर ठिक ठिकाणी पाणी आल्याने कोल्हापूर – बाजारभोगाव व कोल्हापूर – पाचल- राजापूर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. अनेक गावांच्या मुख्य रस्त्यावरील मोरीवर, पुलावर पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान पोर्ले पूलाजवळील पडसाळी रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने दरवर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांचा पाण्यातूनच जीवघेणा प्रवास सुरू आहे. परिसरातील वाळोली, बाजारभोगाव, किसरुळ, पोंबरे, पिसात्री, मानवाड येथील बंधारे मात्र अद्यापही पाण्याखाली आहेत.
बाजारभोगाव (ता.पन्हाळा ) येथील बाजारपेठेतील पूराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे दुकानातगाळ शिरल्याने दुकानांची स्वच्छता करण्याची दुकानदारांची घाई सुरू आहे. बाजारभोगाव व पोहाळे तर्फ बोरगाव दरम्यान मोडका वड नावाच्या शेतात मुख्य रस्त्यावर अद्याप तीन फुटांपर्यंत पूराचे पाणी आले आहे. त्यामुळे बाजारभोगाव – पोहाळवाडी – पोहाळे तर्फ बोरगाव या पर्यायी मार्गांनी वाहतुक सुरू आहे. पोर्ले पूलाजवळील पडसाळी रस्त्याची उंची कमी असल्याने दरवर्षी प्रमाणेच पूराचे पाणी आले आहे.
त्यामुळे जांभळी खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. चार फुटांपर्यंत असलेल्या पाण्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. याशिवाय किसरुळ , काळजवडे – कांडरवाडी , पोंबरे , मानवाड येथील ओढ्यावरील मोऱ्यांवर पूराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. माळापुडे , करंजफेण येथील मुख्य रस्त्यावरही पाणी आल्याने अनुस्कूरा घाटाकडील वाहतुक बंद आहे. परिसरात वादळी वाऱ्यामुळे ऊस भुईसपाट झाले असून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








