पुलाची शिरोली/वार्ताहर
पुलाची शिरोली गावासाठी नगरपरिषद मंजूर व्हावी यासाठी शिवसेनेच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
शिरोली गावची लोकसंख्या एमआयडीसीमुळे प्रचंड वाढली आहे. तसेच अनेक परराज्यातून आलेले लोक शिरोली गावातच स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीला नवीन उपनगरात सेवा सुविधा देताना मर्यादा येत आहेत. म्हणून शिरोली गावाला नगरपरिषदेचा दर्जा देऊन नगरपरिषद मंजूर व्हावी. त्यासाठी ग्रामपंचायतीने शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व कागदपत्राची पूर्तता संबंधित विभागाकडे केली आहे. शासन स्तरावर मंजुरीसाठीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून शिरोली गावाला नगरपरिषद होण्यासाठी सहकार्य करावे. अशी मागणी माजी आमदार सुजित मिणचेकर, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिरोली उपसरपंच सुरेश यादव, यांनी नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आजपासून प्रारंभ
Next Article विंडीज खेळाडूंच्या बांगलादेशमध्ये अनेक चाचण्या होणार









