प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर येथील पुईखडी घाटात डंपर व एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एसटी बस चालकासह तिघे जखमी झाले. हा अपघात आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.
रंकाळा येथून आरे येथे प्रवासी घेऊन निघालेल्या एसटी बसने डंपरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये चालकासह काही प्रवासी जखमी झाले. यामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले. डंपर कोल्हापूरहुन – राधानगरी च्या दिशेने निघाला होता. पुईखडी घाटात एका वळणावर डंपर अचानक थांबला असता पाठीमागून आलेल्या एसटीची डंपरला जोराची धडक बसली.
Previous Articleगृह राज्यमंत्री शंभूराज देसाई रविवारी सांगली दौऱ्यावर
Next Article आग्रा ते राजगड गरुडझेप पायी मोहीम









