-पंचगंगेची पाणीपातळी 44.9 फुटांवर स्थिर, राधानगरी धरणातून 7112 क्युसेकचा विसर्ग सुरु
प्रतिनिधी/कोल्हापूर
चार दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी काही अंशी ओसरला. जिह्यातील पूरस्थिती कायम असून पंचगंगेची पाणीपातळी 44.9 फुटांवर स्थिर राहिली. राधानगरी धरणाचे चार दरवाजांसह वीज गृहातून 7112 क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. तर दुधगंगेतून 1 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. महापुरामुळे जिह्यातील 1 राज्यमहामार्ग, 10 राज्यमार्ग आणि 29 प्रमुख जिल्हा मार्ग अद्याप बंदच आहेत. जिह्यातील 23 गावांमधील 1878 कुटूंबातील 5 हजार 561 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. पंचगंगा धोकापातळीच्या पुढे असल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी शहरातील पूरस्थितीची पाहणी करून संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर ओसरला असला तरी राधानगरीसह पंचगंगा खोऱयातील धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे पुराचे संकट कायम आहे.
सलग चार दिवस सुरु असलेल्या पावसाचा जोर शुक्रवारी ओसरला असला तरी अद्याप 95 बंधारे पाण्याखालीच आहेत. पंचगंगेसह इतर उपनद्यांच्या पुराचे पाणी नदी काठावरील शिवारात पसरल्यामुळे खरीप पिकांसह ऊस पिक पूर्णपणे बुडाले असून या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरबाधित पिकांचे पंचनामे करण्याची गरज आहे. जिह्यात इतरत्र पावसाची उघडीप असली तरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये करवीर 25.64, कागल 39.71, पन्हाळा 60.14, शाहूवाडी 50.50, हातकणंगले 12.38, शिरोळ 7.29, राधानगरी 76.83, गगनबावडा 148.50, भूदरगड 47.80, गडहिंग्लज 24.14, आजरा 79.25, व चंदगड तालुक्यात 104.67 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिह्यातील 95 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, ,शिरगाव, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे हे सहा बंधारे, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन बंधारे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोंडोली, माणगाव, खोची व शिगाव, दानोळी व चावरे व मांगले-सावर्डे हे 9 बंधारे , कासारी नदीवरील करंजफेण, करंजफेण, पेडाखळे, बाजार भोगाव, वाळोली, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे व यवलूज हे सात बंधारे पाण्याखाली गेले असून कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, मांडूकली व वेतवडे हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, व शिरगाव हे तीन बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील गिजवणे, निलजी, साळगाव, खंडाळ व ऐनापूर हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे व अडकूर हे पाच बंधारे, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी आणि कुर्तनवाडी हे दोन बंधारे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सूळकुड, बाचणी व सिद्धनेर्ली हे चार बंधारे, कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, शिरगाव हे तीन बंधारे, धामणी नदीवरील सुळे, आंबर्डे ,म्हासुर्ली, गवशी, पणोरी व गवशी हे 6 बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वेदगंगा,नंद्याळ, वादापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, जांबरे नदीवरील कोकरे, नावेली, उमगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून एकूण 95 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
1878 कुटूंबातील 5561 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
जिह्यातील 1878 कुटूंबातील 5561 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. स्थलांतरीत कुटूंबांची तालुकानिहाय माहिती-गडहिंग्लज बाधित गावांची संख्या 2, पाच कुटूंबांतील 21 व्यक्ती 14 जनावरे, आजरा बाधित गाव 1, एका कुटूंबांतील 9 व्यक्ती, पन्हाळा बाधित गावे 2, 3 कुटूंबांतील 14 व्यक्ती 1 जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीरमधील 3 बाधित गावांमधील 1701 कुटूंबांतील 4 हजार 861 व्यक्ती आणि 1 हजार 38 जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहे. गगनबावडा बाधित 8 गावांमधील 21 कुटूंबांतील 107 व्यक्तींचे आणि 32 जनावरांचे स्थालंतर झाले आहे. चंदगडमधील 6 बाधित गावातील 97 कुटूंबातुल 377 व्यक्ती आणि 47 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 50 कुटूंबांतील 172 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशा जिह्यातील एकूण 23 गावांमधील 1878 कुटूंबांतील 5561 व्यक्तींना आणि 1132 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करण्यात आले आहे.
धरणांतील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)
धरणे टक्sकवारी
राधानगरी 100
दुधगंगा 83
वारणा 84
तुळशी 75.74
कुंभी 82.92
कासारी 88.36
पाटगाव 88.45
घटप्रभा 100
जंगमहट्टी 100
चित्री 80
चिकोत्रा 62
कोदे ल.पा. 100
जांबरे 100








