शैक्षणिक गुणवत्ता टिकणार का तज्ञांचे मत, आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय पालकांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता वरच्या वर्गात थेट प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षण विभागासह, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली असली तरी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा नसल्याने आनंद व्यक्त केला आहे. गतवर्षीप्रमाणे वार्षिक परीक्षा झाली नाही. पण यंदा तर एकही परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकणार का? अशी भिती काही पालकांमधून व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यभर 50 टक्के क्षमतेने पाचवीपासून पुढच्या वर्गाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. राज्यातील 60 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळाले. परंतू 40 टक्के विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. परंतू मुंबई, पुणे, यवतमाळ, अकोला, सोलापूरसह अन्य जिल्हÎांमध्ये शाळा सुरूच झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या तेथे पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी चेहरादेखील पाहिला नाही. मग अध्यापन आणि अध्ययनाचा प्रश्नच येतो कोठे? त्यामुळे राज्यभरातील शिक्षणात सुसुत्रता राहावी यासाठी राज्य शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण विभागाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी काही शिक्षक संघटनांनी जिथे शक्य असेल तिथे परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हÎातील बहुतांश माध्यमिक शाळांमध्ये आकाली चाचणी एक घेतली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतू आता परीक्षाच नसल्याने काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तर पाकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
| सरकारकडे 40/60 चा पॅटर्नची मागणी शैक्षणिक गुणवत्ता टिकावी म्हणून पुढच्या वर्षीच्या इयत्तेत गतवर्षीचा 40 टक्के व संबंधित इयत्तेतील 60 टक्के अभ्यासक्रम असावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. नैसर्गिक संकटाला तोंड देताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला पाहिजे. यंदाही 40 टक्के विद्यार्थी मोबाईलविना शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. मागील इयत्तेचा पाया भक्कम करण्यासाठी शासनाने 40/60 पॅटर्ननुसार महत्वाचा अभ्यासक्रम ठरवून द्यावा. संतोष आयरे (राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ) |
| पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय योग्य कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण खासगी कंपनीत काम करणाऱया कर्मचाऱयांच्या मुलांना मोबाईल मिळाला नसल्याने शिक्षणच घेता आले नाही. त्यामुळे सरसकट पुढच्या वर्गात घालण्याचा निर्णय घेऊन सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. नंदकुमार ढेरे (पायमल वसाहत, कोल्हापूर) |
| विद्यार्थ्यांना शिक्षणाचा रूची राहणार का विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतू सलग दोन वर्षे परीक्षा झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रूचीच राहील की नाही, याची भिती वाटत आहे. झालेल्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी कमी करीत आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परीक्षा व्हायला हवी. विद्या निंबाळकर (पालक, पाचगाव) |
| परीक्षा होणार नाही याचा आनंद वाटला पहिले ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्याने आमच्या मित्रांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. पण कोरोनाची सद्दपरिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा. आम्ही मित्रांनी सध्याच्या अभ्यासक्रमाबरोबर पुढच्या वर्गाचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. इतरांनीही पुढच्या वर्गाच्या अभ्यासाला लागावे. सुजल काटकर (विद्यार्थी, आपटेनगर) |









