बांबवडे / वार्ताहर
शाहूवाडी तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भात पीक नुकसानीची पाहणी खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः बांधावर जाऊन केली तसेच याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले असून शासनदरबारी याबाबत तात्काळ पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली असून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहता कामा नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना कृषी विभागाला दिली.
शाहूवाडी तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी शाहूवाडी तालुक्याचा दौरा केला याप्रसंगी गावातील भात शेतीची पाहणी करून प्रत्यक्ष शेतकरी बांधवांशी संपर्क साधला झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे योग्यपणे करून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशी सुचना ही दिली.
दरम्यान मंडल कृषी अधिकारी ए सी धेडे पावसाने झालेल्या भात शेतीचे नुकसान याबाबत सर्व माहिती दिली. पाहणी दौऱ्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, सुरेश पारळे , अमर पाटील, मंडल कृषी अधिकारी ए सी धेडे एन एस रणदिवे, ए यु सातपुते, कृषी सहाय्यक ए के पाटील , मोहिते मॅडम, आदी उपस्थित होते.









