पन्हाळा / प्रतिनिधी
वीज बील राज्य सरकारने माफ करावे, यासाठी पन्हाळा येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीने वीजबीलांची होळी करण्यात आली.यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान वीज बील माफ व्हावे यामागणीचे निवेदन पन्हाळा महावितरण शाखेचे प्रभारी अधिकारी एस.व्ही.शेळके यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजीव सोरटे म्हणाले,कोरोना विषाणुच्या महामारीमुळे झालेल्या गंभीर परिस्थितीने शेतकरी,कष्टकरी,कामगार व आर्थिक दुर्बल घटक हा आर्थिक विवंचनेत सापडला असुन लाँकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिलामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे.लाँकडाऊन काळातील वीज बील माफ करु असे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकरारने सर्वसामान्य जनतेची दिशाभुल केली आहे.
तसेच प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी नैसर्गिक आपत्ती,नोटाबंदी,कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे.अशा आणिबाणीच्या काळात राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.पण विद्युत कंपन्याशी अवाजवी वाढीव वीज बीले दिल्याने सर्व सामान्य नागरिक चिंताग्रस्त झाल्याने व आर्थिक कोंडी झाल्याने भुकबळीचे व आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे राज्य सरकारने जनहितार्थ लाँकडाऊन काळातील वीज बीेले माफ करावीत.असे म्हणाले.
या मागणीचा लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आले.सदरच्या होळी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर झालेल्या घोषणाबाजीमुळे एसटीस्टँड परिसर दणाणुन गेला होता.यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे,जिल्हाध्यक्ष राजीव सोरटे,आंकाश कांबळे,विक्रमसिंह समुद्रे,सुशांत कांबळे,सागर घोलप,चंद्रकांत काळे,प्रकाश साळोखे,श्रीनिवास खाडे,अमोल कांबळे,महेश हळुकुंदे,शिवाजी पुजारी,मनोज गायकवाड यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









