वाहतूक कोंडीमुळे करावी लागते कसरत, पोलीस व नगरपरिषदचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
प्रतिनिधी/पन्हाळा
ऐतिहासिक पन्हाळगडाची महंती सर्वदुर पसरली आहे. याठिकाणी ऐतिहासिक वास्तुसह निसर्गसंपत्तीचा भंडार पहावयास मिळतो. पण गेल्या महिन्याभरापासुन गडाला एक वेगळेच गोलबोट लागत चालले आहे. येथील अंधारबाव परिसरात ट्रँक्टर बाँईक, लंडन बस, क्यु बाईक आदी पर्यटकांच्या मनोरंजानासाठी बेकायदेशीर पणे रस्त्यावर उभे करण्यात आलेल्या वाहनांच्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. तर याच ठिकाणी घोडे देखील बेकायदेशीरपणे रस्त्यावरच उभे करण्यात आल्याने या घोडास्वारी व्यावसायिक व मनोरंजनात्मक खेळणीधारकांच्यात वादावादीचे प्रकार उद्भवत आहेत. यामुळे वाहतुककोंडीमुळे वाहनचालक व व्यावसायिकांच्यात खटके उडत आहेत. या वादावादीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
निसर्गरम्य वातावरण, थंड हवामान व सर्वसामान्यच्या खिशाला परवडणाऱ्या पन्हाळगडावर पर्यटकांची रेलचेल ही बारामहीने नित्याचीच बनलेली असते. याच पर्यटकांसाठी गडावर ट्रँक्टर बाईक,क्यु बाईक, लंडन बस सारखे मनोरंजनात्मक खेळणी व्यवसाय थाटण्यात आलेला आहे. तर घोडे स्वारीचा व्यवसाय देखील सुरु झाला आहे.पण अंधारबाव परिसरात भर रस्त्यावरच सदरचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. रस्त्यावरच बेकायदेशीरपणे उभे करण्यात आलेल्या मनोरंजनात्मक खेळणी व घोड्यांच्यामुळे गर्दीच्यावेळी येथुन पायी चालणे देखील जिकरीचे बनते. नुकताच येथील घोडा स्वारी व्यावसायिक व खेळणीधारकांच्यात भांडण झाले याची पोलिस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली होती. तर रंगपंचमीच्या दिवशी देखील येथील खेळणीधारकांच्यांत व वाहनचालाकंच्यात जोरदार हाणामारी झाली. तसेच पर्यटक, वाहनचालाकांशी आठवड्यातुन या व्यावसायिकांचे भांडण न होणे म्हणजे नवल ठरते. अशीच अवस्था तबक उद्यान परिसरात देखील पहावयास मिळत आहे.येथे देखील मंनोरजनात्मक खेळणीधारकांच्यात पार्किंगमुळे वादावादी उद्भवत आहे.
हा संपुर्ण व्यवसाय पोलिस व नगरपरिषदेच्या आर्थिक तडतोडीच्या मेहरबानीवरच सुरु असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर समस्येकडे पोलिस प्रशासन व नगरपरिषदेने जाणीवपुर्वक कानाडोळा केला आहे. ऐवढी वादावादीबरोबर बेकायदेशीरपणे रस्त्यावरच उभे करण्यात आलेल्या घोडे व बाईक, लंडन बस यांच्यावर कोणतीच कारवाई पोलिस प्रशासनाकडून होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी याकडे पोलिस प्रशासन, आरटीओ, नगरपरिषदेने कठोर भुमिका घेवुन कारवाई करावी अशी मागणी पन्हाळावासियांच्यातून जोर धरु लागली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









