गावात भितीचे वातावरण, नागरिक रात्र काढत आहेत जागून
प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासुन पावासाने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. या मुसळधार पावसामुळे पन्हाळगडाच्या चार दरवाजा येथील दरड कोळल्याने गडाचा मुख्य रस्ता खचला. पण खरे संकट हे मंगळवारपेठ गावाला धडकले. दरड कोसळुन मोठ्या प्रमाणात दगड-मातीसह गडावरचे पाणी पायथ्याशी असलेल्या या गावात शिरले. त्यामुळे नदीनसुन देखील कधी नाही ते ग्रामस्थांनी महापुराचा अनुभव घेतला. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी मंगळवारपेठ गावाच्या वरील बाजुची दरड एखाद्या काळासारखे आवासुन बसली आहे. या दरडीमध्ये मोठ-मोठ्या दगडांचा समावेश आहे. सदरचे दगड आपल्या घरांचा वेध तर घेणार नाहीत,या भीतीपोटी ग्रामस्थांची झोप उडाली असुन ते भीतीच्या सावटाखाली रात्र जागुन काढत असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.
पन्हाळ्यासह परिसराला भुस्खलनाचे जणु काय ग्रहण लागल्याचे दिसुन येत आहे. दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे पडणे, विजेचे खांब पडणे आदी धोकादायक प्रकार वारंवार वाढु लागले आहे. त्यातच दिनांक 23 जुलै 2021 रोजी चार दरवाजा येथील तटबंदी ढासळली. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी वसलेल्या मंगळवारपेठ गावाच्या वरील बाजुची दरड जीवघेण्या स्थितीतच आहे. त्यातच मुसळधार पावासाने पन्हाळ्याच्या चार दरवाजा येथील मोठी संरक्षक भिंत देखील खाली सरकली आहे. सदरची भिंतीसह मोठ-मोठे दगड आपल्या घरांचे वेध घेणार की काय,या भीतीने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकत त्यांची झोपच उडाली आहे. तरी प्रशासनाने वेळीच लक्ष देवुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
संसार उघड्यावर, मदतीची प्रतिक्षा
मंगळवारपेठ ग्रामस्थांसाठी 23 जुलै 2021 हा काळा दिवस ठरला. दरड कोसळल्याने माती,लहान- मोठे दगड,पाणी गावातील घरा घरात घुसले. यामध्ये अनेक घरांची पडझड होवुन प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकट असल्याने या घटनेमुळे गावातील नागरिकांची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे शासनाकडुन मदतीची प्रतिक्षा लागली आहे.
Previous Articleसांगली : वाळव्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत
Next Article कराडात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू









