प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्यातील 111 पैकी पोंबरे ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली असून येत्या 31 ऑगस्ट 2020 पासून मुदत संपणाऱ्या 41 ग्रामपंचायतीवर पुढील तीन महिने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याने 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार 32 प्रशासकाकडून पाहिला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे यांनी सांगितले.
कोरोनामुळे शासनाने ऑगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने पुढील तीन महिने ग्रामपंचायतीवर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पन्हाळा तालुक्यातील ऑगस्ट 2020 व नोव्हेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 41 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुदत संपलेल्या पोंबर या ग्रामपंचायतीवर यापूर्वीच प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
पुढील तीन महिन्यात कोरोनाचा पादुर्भाव कमी झाल्यावर निवडणुका होऊ शकतील की प्रशासकाला मुदतवाढ मिळणार हे आत्ताच सांगता येणार नाही. 41 ग्रामपंचायतीवर 32 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक प्रशासककाडे एक अथवा दोन ग्रामपंचायती देण्यात आल्या असून त्यांच्यामार्फत कारभार चालवला जाणार आहे.
प्रशासक नियुक्त ग्रामपंचायती पुढील प्रमाने पोहाळे तर्फ बोरगाव, माजनाळ, पुनाळ ,अंबार्डे,सातार्डे,हरपवडे ,निवडे म्हाळुंगे तर्फ बोरगाव,धबधबेवाडी ,नेबापुर, सोमवारपेठ, बुधवारपेठ, पोखले ,वाघवे ,नावली, इंजोळे, आवळी ,नणुद्गे ,कनेरी, केखले ,दिगवडे, तिरपण, पोहाळवाडी ,पुशिरे तर्फ बोरगाव, उंड्री ,तेलवे, वारनूळ, निकमवाडी ,उत्रे ,जाफळे ,पोर्ले तर्फ ठाणे ,सावर्डे तर्फ सातवे ,कोडोली, मोहरे ,कळे ,कसबा सातवे ,देवाळे ,पैजारवाडी, आपटी ,जेऊर, आरळे. आहेत.
Previous Articleमोदी सरकारवर 50 टक्के चिनी संतुष्ट
Next Article आरजेडी नेता तेजस्वी यादव झाले क्वारंटाइन









