कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन दीक्षांत समारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा 57 दीक्षांत समारंभ मंगळवारी 6 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या दीक्षांत समारंभात एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. त्यामुळे दीक्षांत समारंभाच्या दिवशी दीक्षांत गाऊन आणि टोपी घालून फोटो सेशन करण्याला विद्यार्थी मुकणार आहेत. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळÎाला साक्षी ठेवून आकाशात उडी आनंद व्यक्त केला जातो. पण यंदा ऑनलाईन समारंभामुळे हा आनंद सोहळा विद्यापीठ परिसरात स्नातकांना साजरा करणार येणार नाही.
दीक्षांत समारंभ म्हंटल की, सकाळच्या ग्रंथदिंडीपासून ते दिवसभर पदवीदान समारंभापर्यंतचे आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम डोळ्यासमोर उभे राहतात. दुसरीकडे हजारो विद्यार्थी विद्यापीठ परिसरात एकत्र येऊन कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देतात. पदवी प्रमाणपत्र हाती पडताच विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळÎासमोर उभे राहून फोटो सेशन करत असतात. शिवाय विद्यापीठाची मुख्य इमारत फोटोत येईल, असा अँगल पकडून पदवीसोबत फोटो काढले जातात. मित्रमैत्रिणी एकत्र येवून पदवीसोबत आकाशात उडी घेतल्याची छबी टिपल्यानंतरचा त्यांच्या चेहऱयावरील आनंद पहाण्याजोगा असतो. याच ठिकाणी भविष्यातील करिअरची दिशाही ठरत असते. पीएच.डी.च्या संशोधन
प्रबंधासाठी 3 ते 5 वर्षे कष्ट करणारे स्नातक पदवीसोबत घेतलेला फोटो जपूण ठेवतात. अशा या उत्साहवर्धक व अनोख्या दीक्षांत समारंभाचे वातावरण विद्यापीठात यंदा पहायला मिळणार नाही. शिवाय ग्रंथ दिंडी, ग्रंथ महोत्सवातील पुस्तक स्टॉल, फोटोग्राफी, खाऊच्या गाडÎा असेही चित्र दिसणार नाही. दीक्षांत समारंभाचा नियम म्हणून कुलगुरू डी. टी. शिर्के हे आपले कार्यालय ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत आठ लोकांच्या उपस्थितीत फक्त दीक्षांत मिरवणूक काढतील. यानंतर 50 पेक्षा कमी पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन दीक्षांत समारंभ होईल. विद्यार्थ्यांना हा समारंभ ऑनलाईन पाहता येणार आहे. हा समारंभ झाल्यानंतर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महाविद्यालयांमध्ये दीक्षांत समारंभ करु असे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.
रेल्वे मेल सर्व्हीसद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठवणार
विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या कालावधीत यंदा पहिल्यांदाच 77 हजार 542 विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत. दीक्षांत समारंभ झाल्यानंतर त्यांना रेल्वे मेल सर्व्हीसद्वारे (आरएमएस) पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे. सध्या सर्व पार्सल तयार असून, दीक्षांत समारंभानंतर जवळच्या विद्यार्थ्यांना 2 ते 4 दिवसात पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठवले जाईल.
स्टेजवर कुलपती पदक घेण्याची संधी हुकली
राष्ट्रपती सुवर्ण पदक व कुलपती मेडल पाहूण्यांच्या हस्ते घेतानाचा क्षण आणि त्यानंतर मित्र-मैत्रिणी, आई-वडील यांच्याकडून होणारे अभिनंदन हा आनंद म्हणजे जीवनातील सर्वोच्च आनंद मानला जातो. मला कुलपती पदक जाहीर झाले परंतू मान्यवरांच्या हस्ते पदक स्वीकारण्याच्या आनंदाला कोरोनामुळे मुकावे लागले आहे.
महेश्वरी गोळे (छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा)
लिंकद्वारे दीक्षांत समारंभ सहभागी व्हा…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होणाऱया दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या https://www.youtube.com/c/shivVarta या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे.
गजानन पळसे (परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, शिवाजी विद्यापीठ)









