वार्ताहर / गोकुळ शिरगाव
नेर्ली ता. करवीर येथील धीरज धनाजी खबाले वय 19 या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत त्याचे चुलत भाऊ संजय तानाजी खबाले यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
नेर्ली विकासवाडी गावच्या हद्दी मधील मकरंद चौगुले यांच्या शेतात असलेल्या विहिरीत सकाळी साडेसातच्या दरम्यान पोहण्यासाठी विहिरीत गेला असता विहिरीत धीरज याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला कळल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळाकडे धाव घेत विहिरीत बुडालेला मृतदेह बाहेर काढला. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचे वडील पुर्वीच वारले असून घरात तो एकुलता-एक होता. त्याच्यामागे आई दोन विवाहित बहिणी आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








