प्रतिनिधी / कुरुंदवाड
बुद्धिदेवता श्री गणेश याच्या गणेश चतुर्थी उत्सवास उद्या शनिवार दिनांक 22 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच नृसिंहवाडी आणि परिसरात घरोघरी गणरायाच्या मुर्तीचे उत्साहात आगमन झाले. गेल्या वर्षीचा महापूरआणि यावर्षीचे कोरोना संकट याचा या गणपती उत्सव वर चांगलाच परिणाम झाला असला तरी गणरायाच्या आगमनाने आलेले हे कोरोना रुपी विघ्न नष्ट होईल या आशेने आपल्या लाडक्या गणरायाला आज अनेकांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपतीउत्सवासाठी लाडक्या बाप्पाला घरी आणले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नको या शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार सकाळ पासूनच अनेकांनी श्रींची मूर्ती आणण्याचा प्रारंभ केला. नेहमी सारखा जल्लोष नसला तरी उत्साह मात्र कायम होता. यावर्षी नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड परिसरात घरगुती गणेश मुर्ति या 90 टक्क्यांहून अधिक शाडूच्या व नैसर्गिक रंगापासून तयार केलेल्या आहेत. या पर्यावरण पूरक मूर्ती घरात आणून एक प्रकारे पर्यावरण जतनाचा संदेश अनेकांनी दिला आहे.
शनिवार दिनांक 22 ऑगस्ट पासून गणपती उत्सवास प्रारंभ होत असून घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवात सकाळी पूजा सायंकाळी आरती नैवेद्य मंत्रघोष मंत्रजागर आधीच्या निनादाने वातावरण मंगलमय होऊन जाणार आहे. एकूणच गणरायाच्या आगमनाची जल्लोष नसला तरी उत्साह होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









