परस्पर विरोधी फिर्यादी, दोघे जखमी
प्रतिनिधी/वारणानगर
पोखले ता. पन्हाळा येथे निवडणूक निकालानतंर दोन गटात झालेल्या मारामारीत दोघे जण जखमी झाले. यानंतर दोन्ही गटाने परस्पर विरोधी कोडोली पोलिसात फिर्याद दाखल केल्याने दोन्ही गटाच्या ३३ जणांना पोलिसानी अटक केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झालेले कारणातून गज काठ्या घेवून जमावाने एकत्र येवून शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्या प्रकरणी १७ व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत फिर्यादी संदीप जयवंत आमले, उदय कृष्णात निकम हे दोघेजण जखमी झाले आहेत.
प्रताप पाटील यांचे घरी ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत व पार्टीच्या अपयशाबाबत चर्चा करीत बसले असताना संशयीत आरोपीनी प्रताप पाटील यांचे घरावर दगडफेक केली. प्रकरणी स्वप्नील तानाजी पाटील रा. पोखले यांचे फिर्यादीवरून संशयीत आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.









