नुकसान भरपाई न मिळाल्यास लोक न्यायालयात जाण्याचा इशारा
कुंभोज येते जैन इरिगेशन सिस्टिम जळगाव या कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या जी नाईन जातीच्या केळीच्या निकृष्ट रोपांमुळे शेतकऱ्याचे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान, भरपाई न मिळाल्यास लोक न्यायालयात जाणार – सुनील वाडकर
वार्ताहर / कुंभोज

कुंभोज ता. हातकणंगले येथे जैन इरिगेशन सिस्टिम जळगाव या कंपनीच्या वतीने जी 9 जातीचा केळीच्या रोपांचे वितरण गेल्या नऊ महिन्यांपूर्वी कुंभोज येथील शेतकऱ्यांना करण्यात आले होते. परिणामी सदर रोपामध्ये दोष असून सदर केळी रोपे निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत केळी उत्पादक शेतकरी सुनील वाडकर यांनी व्यक्त केले.
निकृष्ट दर्जाच्या रोपांच्यामुळे सुनील वाडकर यांच्या व अन्य चार एकरातील केळीच्या झाडांचे व उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केळीचे फळ वाढले नसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सध्या सदर कळीला कोणत्याही पद्धतीची मागणी नसून, सदर केळी शेतकरी 20 ते 25 लाख रुपयेला नुकसानीत असल्याचे मत केळी शेतकरी सुनील वाडकर यांनी बोलताना व्यक्त केले.
सदर केळी बागेची पाहणी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ शेती तज्ञांची टीम, जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, मंडलाधिकारी यांनी प्रत्यक्ष कुंभोज येथील घटना स्थळी केळी बागेची पाहणी केली, सदर सर्व घटनेची माहिती घेऊन लवकरच आपण आहवाल देऊ असे मतही त्यांनी व्यक्त केले नुकसान भरपाई न मिळण्यास आपण सदर कंपनीच्या विरोधात लोक न्यायालयात जाणार असल्याचे मत कुंभोज येथील नुकसानग्रस्त शेतकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
परिणामी गेले कित्येक वर्ष केळी हा काही कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय असून, सदर शेतकरी जैन इरिकेशन सिस्टीम यांचे रोपाचीच लागण करतात पण यांच वर्षी अशा पद्धतीच्या तक्रार निर्माण झाल्याने केळी रोपे पुरवठा करणारी कंपनी शेतकरी वर्ग यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. सदर केळी रोपे देणाऱ्या कंपनीने सदर घटनेमध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.
सध्या कुंभोज येथील जवळजवळ चारशे एकर क्षेत्र केळी लागवडीखाली असून सदर रोपाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी लवकरच सदर कंपनीचे अधिकारीही सदर बागेना भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, सुनील वाडकर, अनिल मोघे अनिल नारपा तसेच कुंभोज परिसरातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









